Thursday 27 April 2017

विठ्ठला चे मधुर सूर !

चित्रपटातील गाणी हा सध्या एक महत्वाचा घटक बनला आहे. ज्या चित्रपटाची गाणी रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात तो चित्रपट नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जातो. असाच एक दमदार मराठी चित्रपट 'विठ्ठला शप्पथ' आपल्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या नावावरून तुम्हाला कळलंच असलं चित्रपटाचे कथानक विठ्ठलाशी निगडित असेल परंतु या चित्रपटाचे नाव जितके हटके आहे तितकीच ह्या चित्रपटाची गाणीही कमाल आहेत.
               ह्या चित्रपटातील नुकतंच एका गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले.  'ठायी ठायी माझी विठाई' असे सुंदर बोल या गाण्याला लाभले आहेत. गीतकार मंगेश कांगणे ह्यांनी ह्या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ह्या गाण्यात एकूणच विनवणी आहे आणि विठ्ठलाची स्तुती आहे. मराठी चित्रपटसृष्टीचे सुरांचे जादूगार म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे चिनार-महेश यांनी ह्या गाण्याला एका वेगळ्याच पद्धतीने संगीतबद्ध केले आहे. विठ्ठलावरील गाणी आपण बरीच ऐकतो परंतु अजून एक विठ्ठलावरच गाणं तयार करणं एक नवीन लोकांना आवडेल अशी चाल तयार करण्याचं सुंदर काम चिनार-महेश ह्या जोडीने केले आहे.

             

              चिनार-महेश ह्या जोडीने प्रत्येकवेळी रसिकप्रेक्षकांना आपल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध केले आहे. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन आणि पूर्वी पेक्षा काहीतरी वेगळं घेऊन येत असतात ह्यावेळी सुद्धा असच काहीतरी फ्रेश आणि नवीन ते आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहेत.आणि त्यांच्या ह्या कामात त्यांना एक सुरेल आवाज लाभला तो म्हणजे गायक राहुल देशपांडे ह्यांचा. राहुल देशपांडे ह्यांच्या आवाजाला आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांच्या आवाजातून सादर होणार प्रत्येक गाणं म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असते. विठ्ठला शप्पथ ह्या चित्रपटात एकूणच ४ गाणी आहेत आणि हि चारही गाणी वेगळ्या धाटणीची असून चिनार-महेश यांनी ती संगीत बद्ध केली आहेत.जिथे एवढे सगळे दिग्गज कलाकार एका गाण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यामधून काहीतरी अलौकिक असा अनुभव प्रेक्षकांना येणार हे नक्की. त्यामुळे ह्यावर्षीचे सुपरहिट सॉन्ग घेऊन हि सर्व टीम सज्ज आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.
         गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन प्रस्तुत चंद्रकांत पवार दिग्दर्शित 'विठ्ठला शप्पथ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.








majja.ooo : Ankita Lokhande.

'करार' चित्रपट २६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित

             
         सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाला कीअनेक चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज असतात. मात्र इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)च्या समोरउन्हाळ्याच्या सुट्टीत सिनेमा प्रदर्शित करण्यास हिंदीचे निर्माते धजावतात. याच संधीचा फायदा एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांना होतो. संपूर्ण कुटुंबासोबत सिनेमा पाहता येण्याजोगी हीच सुट्टी असल्याकारणामुळेअनेक महिने प्रदर्शनासाठी थांबलेल्या 'करारया सिनेमाला देखील याच महिन्याचा मुहूर्त लाभला आहे. मनोज कोटियन दिग्दर्शित हा सिनेमा २६ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे करारबद्ध झाले आहे.  

बिपीन शाह मोशन पिक्चर्स  गौतम मुनोत प्रॉडक्शन्स एल.एल.पी. प्रस्तुत, क्रेक इंटरटेंटमेंटस् प्रा. लि. कृत 'करारहा सिनेमा प्रेक्षकांना नवा दृष्टीकोन देणारा ठरणार आहे.  आपल्या अभिनयाबरोबरच सामाजिक संदेश लोकांपर्यंत पाहोचवण्यास नेहमी तत्पर असलेला सुबोध भावे यात मध्यवर्ती भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात सुबोधसोबत उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर या अभिनेत्रीदेखील प्रमुख भूमिकेत आढळणार आहेत. 

या सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत दिग्दर्शक मनोज कोटियन यांनी सांगितले कि, 'करारहा एक कौटुंबिक सिनेमा असूनया सिनेमाचा विषय लक्षात घेताकुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी हा सिनेमा पाहायला हवाअशी आमची इच्छा होती. मे महिन्याच्या सुट्टीत सगळे कुटुंब एकत्र येत असल्यामुळे, 'करारसिनेमा याच हंगामात प्रदर्शित करण्याचा आम्ही विचार केला'. तसेच हा सिनेमा पाहिल्यानंतर आजची वर्कहोलिक पिढी आपल्या बीजी शेड्युलमधून थोडावेळ आपल्या कुटुंबासाठी नक्की काढेलअशी आशा देखील ते व्यक्त करतात.    


समाजात विशिष्ट नाव आणि ओळख बनवण्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणाऱ्या एका करारबद्ध तरुणांची कथा यात मांडली आहे. आयुष्याला केवळ 'करारम्हणून पाहणाऱ्या या तरुणाच्या वैवाहिक आयुष्यातल्या उणीवाआणि त्यातून भविष्यात उद्भवणा-या समस्या यात मांडण्यात आल्या असून, या सिनेमातील गाणी देखील प्रेक्षकांना रोमांचित करणारी आहेत. या गाण्यांचे गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे यांनी लेखन केले आहे. संगीत दिग्दर्शक विजय गवंडे आणि परेश शाह यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्तेश्रेया घोषालबेला शेंडेसोनू कक्करजसराज जोशीनेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा सुरमयी गायकांचा आवाज लाभला आहे. 

संजय जगताप लिखित या सिनेमाचे संवाद आणि पटकथा हेमंत एदलाबादकर यांनी लिहिले आहेत. हा सिनेमा रसिकांना मंत्रमुघ्ध करणारा ठरेल यात शंका नाही. आजच्या धावत्या जगात बदलत चाललेली मातृत्वाबाद्दलची मानसिकता सांगणारा हा सिनेमा कुटुंबवत्सल प्रेक्षकांना आपलासा करण्यास लवकरच येत आहे. 

Sunday 23 April 2017

FU Movie Teaser Launch

              तो परत आलाय... असं म्हणत खरंच आकाश ठोसर पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या भेटीला आला आहे. F.U.या त्याच्या आगामी चित्रपटाचे टीजर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. आकाश चा दुसरा चित्रपट तोही महेश मांजरेकर दिग्दर्शित म्हणजे चित्रपट कसा असेल हे तुम्हाला विशेष सांगण्याची गरज नाही. टिझर लाँच ला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली तसेच चित्रपटाची स्टार कास्ट म्हणजेच आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, माधव देवचके, मयुरेश पेम, सत्या मांजरेकर, हि यंग स्टारकास्ट यांनी हजेरी लावली. विशेष उपस्थिती होती ती म्हणजे सलमान खानची मैत्रीण लुलिया हिची.

                महत्वाची गोष्ट म्हणजे बॉलीवूड अभिनेते बोमन इराणी आणि अभिनेत्री इशा कोपीकर ह्यांची झलक सुद्धा आपल्याला ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा टिझर तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला नक्की कळवा.
लिंक: https://www.youtube.com/watch?v=HX22O9kKW8w


काही छायाचित्रे :













majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday 20 April 2017

             डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. नुसता डॉक्टरांचा चेहरा जरी पाहिला तरी रुग्णाला ठीक झाल्यासारखे वाटायचे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे हेच नाते आता हळूहळू लोप पावत आहे.व्यावहारिकतेच्या या जगात रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांचा डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. त्यामुळेच तर डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रकार आता चेव धरू लागले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांची बाजू मांडण्यासाठी विक्टरी व्हिजन बॅनरखाली अभिनेत्री प्रियांका यादव निर्मित आणि प्रमोद मोहिते सहनिर्मित 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' हे गाणे लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे . रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रोषांचा सामना करणाऱ्या आजच्या डॉक्टरांचा आक्रोश मांडणा-या या गाण्याचे नुकतेच जुहू येथील आजीवासन स्टुडियोत सॉंग रेकोर्डींग करण्यात आले. प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' या गाण्याचे रोहन पटेल यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, सुरेश वाडकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि वैशाली सामंत या गोड गळ्यांच्या गायकाचा आवाज त्याला लाभला आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांच्या मानसिकतेचा वेध घेणा-या या गाण्याचे बोल काही डॉक्टरांनीच लिहिले आहेत. डॉ. स्वप्नील मानकर, डॉ. सुनंदा डावरे अशी त्यांची नावे असून अविनाश घोडके यांनी देखील हे गाणे शब्दबद्ध करण्यात त्यांना सहाय्य केले आहे.  





उपचारादरम्यान पेशंट दगावला अगर काही बरेवाईट झाल्यास, डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मनोवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे, त्यासाठी डॉक्टरांची बाजू देखील पडताळून घेणे गरजेची आहे. 'चुकलं जरा डॉक्टर होऊन' हे गाणे डॉक्टरांच्या याच सकरात्मक बाजूचे दर्शन प्रेक्षकांना करून देणार आहे.    




 

            TTMM म्हणजेच तुझं तू आणि माझं मी... हटके नाव हटके कथानक आणि अर्थात हटके असं टिझर पोस्टर घेऊन हि टीम पुन्हा आपल्या भेटीला आली आहे. पोस्टर बघता समुद्र आणि ह्या दोघांचा प्रवास अश्या गोष्टीचा अंदाज लावता येतो. आता ह्यात नक्की काय साम्य आहे हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.


एक नवीन फ्रेश जोडी आपल्याला ह्या चित्रपटात बघायला मिळणार आहे ती म्हणजे ललित प्रभाकर आणि नेहा महाजन. ह्या पोस्टर ने प्रत्येकाची उत्सुकता तर वाढवलीच आहे पण हि जोडीही सध्या खूप चर्चेत आहे. हि जोडी ऑनस्क्रीन आल्यावर प्रेक्षकांची किती मन जिंकेल हे लवकरच आपल्याला समजेल. Mirah Entertainment आणि Vaishali Entertainment प्रस्तुत कुलदीप जाधव दिग्दर्शित हा चित्रपट १६ जुने २०१७ ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.






majja.ooo : Ankita Lokhande.

Wednesday 19 April 2017

आपला हजारो चाहत्यांसमवेत कापला केक.....सोनू निगम, शान ने वाढवली रंगत

             हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘जम्पिंग जॅक’ अभिनेता म्हणून नावाजलेले बॉलीवूडचे ज्येष्ठ कलाकार जितेंद्र यांचे व्यक्तिमत्व प्रत्येकांना लुभावणारे असेच आहे! तरुणांनाही लाजवेल असे चिरतरुण आणि स्वास्थ्य लाभलेल्या या बॉलीवूडस्टारने नुकतेच ७५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या या हेल्दी पंच्याहत्तरी निमित्ताने स्वयम्दीप सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था आयोजित 'सेलिब्रेटिंग जितेंद्र' हा मेगा म्युजीकल शो नुकताच सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. आपल्या हजारो चाह्त्यांच्या इच्छेखातर जितेंद्र यांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावत, पंच्याहत्तरी साजरी केली. एव्हढेच नव्हे तर, आपल्या सिनेमाच्या गाण्यावर ठेका धरत त्यांनी प्रेक्षकांनादेखील नाचवले. 


या कार्यक्रमात जितेंद्र यांच्या चित्रपटातील गाण्यांचे मेगा लाइव कॉन्सर्ट सादर करण्यात आले, विशेष म्हणजे शान आणि सोनू निगम यांनी देखील या कॉन्सर्टमध्ये गाणे गात कार्यक्रमाची संध्याकाळ म्युजीकल केली. एव्हढेच नव्हे जितेंद्र यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न ज्येष्ठ संगीतकार हरीश भिमानी यांनी आपल्या खुमासदार निवेदनातून केला. जितेंद्र यांनी देखील त्यांना पुरेपूर साथ देत साभागृहात हास्याची लाट आणली. जीतेद्र यांच्या 'हेपी बर्थ डे टू यू' या सुप्रसिद्ध गाण्यांवर शान, सोनू निगम तसेच इतर सर्व गायकांनी ताल धरत जितेंद्र यांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या. यादरम्यान, त्यांच्या हिंदी सिनेसृष्टीतील अभिनयाच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा 'हिम्मतवाला' हा पुरस्कार देऊन गौरवदेखील करण्यात आला.   





जितेंद्र यांची अभिनय कारकीर्द आजच्या तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेल्या जितेंद्र यांना हिदी चित्रपटसृष्टीतले हे यश टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. एकवेळ त्यांची कारकीर्द संपुष्टात आली असे वाटत असतानाच हिम्मतवाला, खुदगर्ज या सारख्या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा नव्याने सुरवात केली. अथक परिश्रम आणि अत्माविश्वाच्या जोरावर जितेंद्र यांनी यशाची पुन्हा पुन्हा मुसंडी मारली आहे. त्यांच्या याच परिश्रमाची दखल 'सेलीन्रेटिंग जितेंद्र' या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आली. जितेंद्र यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनीदेखील या कार्यक्रमात अपेक्षेहून अधिक हजेरी लावली होती, स्वयम्दीप सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. भावनाराज यांनी हा संगीत सोहळा खास बनविणाऱ्या सर्व कलावंतांचे आभार मानले. तसेच 'जितेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. 'सेलिब्रेटिंग जितेंद्र' या शोद्वारे जमा झालेली रक्कम निधीच्या रुपात सामाजिक कार्यात वापरण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. 

सयाजी शिंदे भ्रष्ट आमदाराच्या भूमिकेत !!

                  अलीकडे मराठी चित्रपटांतील कथांमध्ये आलेले वैविध्य हे कमालीचे लक्षणीय आहे. आजवर अनेक 
मराठी, हिंदी तसेच साऊथच्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने घराघरात पोहचलेले अष्टपैलू अभिनेते सयाजी शिंदे आगामी "शूर आम्ही सरदार" या चित्रपटात एका भ्रष्ट आमदाराची भूमिका साकारली आहे.  
दहशवादाविरोधात एकत्र आलेले हे तीन तरूण काय करतात, त्यांना दहशवादाविरोधात काम करण्यात यश येतं का या आशयसूत्रावर हा चित्रपट आधारित आहे. गणेश लोके यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, अभिनय व निर्मिती योग्यप्रकारे निभावली आहे. प्रकाश जाधव हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. इंडो ऑस एंटरटेन्मेंट, झुमका फिल्म्स, सासा प्रॉडक्शनच्या डॉ. प्रज्ञा दुगल, श्वेता देशपांडे आणि गणेश लोके यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात सयाजी शिंदे यांच्यासह शंतनू मोघे,संजय  मोने, भारत गणेशपुरे व गणेश लोके ह्यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत 



गणेश लोके यांनी जेव्हा मला या चित्रपटाची कथा ऐकवली त्यावेळी मी लगेच होकार दिला. एका भ्रष्ट आमदाराची भूमिका मी साकारली असून या भूमिकेला साजेशी विनोदी छटाही यात मी रंगवली आहे. ऑस्ट्रेलिया स्थित गणेश लोके यांचे देशावरील प्रेम आणि चित्रपट निर्मितीबाद्द्ल असलेले पॅशन कमालीचे असून येत्या २१ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असल्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले.

Tuesday 18 April 2017

            महाराष्ट्रातील शेतकरी हा खूप महत्वाचा घटक आहे. ह्याच नाजूक विषयावर आधारित धोंडी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शेतकरी आत्महत्या ह्याबद्दल त्यांच्या मुलांना काय वाटते त्यांची  मानसिकता नक्की कोणते वळण घेते हे सर्व कथानक म्हणजे धोंडी.

चित्रपटाचे टिझर पोस्टर बघता महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती ह्या एका पोस्टर मध्ये मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे.




           पोस्टर बघून हा चित्रपट नक्कीच एक वेगळा ठसा उमटवेल यात काही शंका नाही. सॉईल इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट निर्मित आणि सॉइल गृप ऑफ कंपनीज प्रस्तुत "धोंडी "या चित्रपटाचे निर्माते शिवाजी जाधव,भानुदास पवार,शैलेंद्र सुपेकर असून मोनीश पवार हे दिग्दर्शक आहेत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या  भेटीला येणार आहे.





majja.ooo : Ankita Lokhande. 

Monday 17 April 2017

"हुंटाश" चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला...वाचा येथे

"हुंटाश" चित्रपटाचे  पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

    हुंटाश म्हणजे नक्की काय..? याची उत्सुकता तुमच्यासारखी आम्हालाही आहेच. एक वेगळ्या धाटणीचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नुकतंच  पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. विविध रंगानी नटलेलं हे पोस्टर बघता चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यात काही शंका नाही शिवाय किशोर नांदलस्कर,विजय चव्हाण,अरुण नलावडे या दिग्गज अभिनेत्यांची एक वेगळीच भूमिका यात आपल्याला पाहायला मिळणार आहे असे दिसून येतेय.


     याव्यतिरिक्त या चित्रपटात ,उषा नाडकर्णी,संजिवनी जाधव,निला गोखले,अंकुश ठाकूर,प्रियांका पुलेकर हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. दगदगीच्या या दिवसात  हुंटाश हा चित्रपट नक्कीच मनोरंजनाचे २ तास देऊन जाईल यात काही शंका नाही. चित्रपटही अजून बऱ्याच गोष्टी सध्यातरी गुलदस्त्यात आहेत.
         नक्षत्र मुव्हीज प्रस्तुत अच्युत नावलेकर आणि अपर्णा प्रमोद निर्मित अंकुश ठाकूर लिखित आणि दिग्दर्शित "हुंटाश" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





majja.ooo : Ankita Lokhande.

शेफ देवव्रत आनंद जातेगावकरांच्या मार्गारीन 'त्रिमूर्ती' शिल्पाची झाली 'गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद...

         सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरदेशीय (डॉमेस्टिक) विमानतळाच्या आवारात (अरायवलमध्ये) गेल्या महिन्याभरात पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शेफ देवव्रत आनंद जातेगावकर यांच्या मार्गारीन 'त्रिमूर्तीशिल्पाची दखल आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. हे शिल्प वातानुकुलीत काचेच्या कॅबिनमध्ये करण्यात आले होते, आणि २४ फेब्रुवारी २०१७ (महाशिवरात्री)ला पूर्ण होऊन सर्वांसाठी एक महिना प्रदर्शनास ठेवण्यात आले होते. 
         मुंबईत येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट ठरलेल्या या त्रिमूर्तीची ख्याती जागतिक स्तरावर देखील पसरली आहे. तब्बल १५०६.८०० किलो वजनाचे हे शिल्प साडे आठ फुट लांबीचे व साडे सहा फूट उंचीचे होते. अवघ्या १० दिवसात या भव्य शिल्पाचे कामकाज शेफ देवव्रत जातेगावकर यांनी पूर्ण केले. त्यासाठी दिवसाचे १४ तास ते या काआर्व्हिंग कलाकारीसाठी सदर ठिकाणी व्यस्त असायचे. या शिल्पाद्वारे भारतीय संस्कृतीची महतीजागतिक पातळीवर आणखीन वाढवण्याचा मानस शेफ देवव्रत जातेगावकर यांचा आहे. 
         मार्गारीन (लोण्याचा पदार्थ) हा पदार्थ तेलापासून बनवतात. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर बेकरी उत्पादकामधे केला जातो. फळेभाज्याचॉकलेट तसेच मार्गारीन,काआर्व्हिंगमध्ये शेफ देवव्रत यांनी कौशल्य विकसित करून ती आपली खासियत बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले असूनमार्जरीन शिल्पकलेत शेफ देवव्रत यांनी सुवर्णपदकदेखील पटकावले आहे २०१२ साली जर्मनीमध्ये झालेल्या कलिनरी ऑलिम्पिकमध्ये शेफ देवव्रत यांच्या 'O सिंड्रेलाया मार्गारीनच्या शिल्पाने भारताला पहिलवाहिले रौप्यपदक मिळवून दिले होते. सत्तर देशातील जवळ जवळ १८०० शेफ्सनी त्यात भाग घेतला होता. महाला सकट सिंड्रेलाची संपूर्ण कथा दर्शविणारी कलाकृती देवव्रत यांनी मार्गारीनमध्ये साकारली होती. 
                'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या कलेच्या माध्यमाने नाव नोंदवून या बहुगुणी अवलियाने भारताची कला महती आणखीन वाढवली आहे. या रेकॉर्ड संबंधी विचार व्यक्त करताना शेफ देवव्रत म्हणाले, ' हे शिल्प साकारणं हे गेल्या कित्येक वर्षांचं माझं स्वप्न होतंमाझे वडील आनंद विनायक जातेगावकर माझे स्फूर्तीस्थान आहेतत्याच्या प्रेरणेनेच हे काम मी सुरु केले होते. शिल्प करताना अनेक अडचणी आणि प्रसंग माझ्यासमोर आले. कॅबिनचे तापमान आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला मूर्तीला तीन वेळा मोठ्या तडा गेल्या होत्या. तसेच शिल्प पूर्ण झाल्यानंतरसुद्धा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडून कडीपाहणी करण्यात आली, आणि शेवटी स्वप्न साकार झाले. माझ्यासोबत माझी शेफ मंडळींची टीम रात्रंदिवस काम करत होती'.
            शेफ देवव्रत जातेगावकर दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमातून लोकांच्या घराघरात पोहोचले आहेत. रेसिपी व्यतिरीक्त त्यांचा काआर्व्हिंग हा पैलू विशेष लोकप्रिय आहे. या रेकॉर्डसंबंधी माहिती व फोटो www.devwratjategaonkar.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.






Monday 10 April 2017

                मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा विविध स्तरावरील कलाकृतींचा आणि कलावंतांना गौरविणाऱ्या संस्कृती कलादर्पणचा नुकताच मोठ्या दिमाखात नाट्यसोहळा पार पडला. ८ ते १० एप्रिल दरम्यान माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात पार पडलेल्या या महोत्सवाची सांगता 'कोडमंत्र'' या नाटकाद्वारे झाली. तत्पूर्वी ८ एप्रिलला सुरु झालेल्या या नाट्यमहोत्सवाला उपस्थित असणा-या मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला होता. यंदाचे संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून, सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील नाट्यरसिकांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला. यावर्षीच्या १७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी नाट्यसोहळ्यात रेखा सहाय, प्रमोद पवार, सविता मालपेकर, प्राजक्ता कुलकर्णी, मिलिंद गवळी, उदय धुरन, सुप्रिया पाठारे, रमेश मोरे आणि संजिव देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते. यंदा नाट्यविभागातून अंतिम फेरीसाठी सात नाटकांची निवड झाली असून, यात साखर खाल्लेला माणूस (एकदंत निर्मित), कोडमंत्र (अनामिका निर्मित), ह्या गोजिरवाण्या घरात (वेद प्रॉडक्शन), छडा(अवनीश प्रॉडक्शन), यु टर्न २ (जिव्हाळा निर्मित), तीन पायांची शर्यत(सुयोग /झेलू निर्मित), के दिल अभी भरा नही (वेद प्रॉडक्शन)  या नाटकांचा समावेश आहे.  एकूण २४ नाटकांनी यात सहभाग घेतला होता. नाट्यपरिक्षण विभागातील कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी आणि प्रमोद पवार यांनी यंदाच्या नाट्यस्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली आहे.  
 
या महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतीच्या कलाकार मंडळीसोबत अगदी माफक दरात नाटकांचे प्रयोग पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे यंदा प्रेक्षकांसाठी सेल्फी कॉर्नर ही स्पर्धादेखील राबविण्यात येत असून, यात विजेते ठरलेल्या निवडक प्रेक्षकांना ७ मे रोजी होणाऱ्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१७ च्या पुरस्कार सोहळ्याचे पास मिळणार आहे.  तसेच लवकरच चित्रपट विभागातील पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वोकृष्ट १० चित्रपटांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती संस्कृती कलादर्पण अध्यक्ष -संस्थापक चंद्रशेखर सांडवे आणि अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी दिली. 




Friday 7 April 2017

"हुंटाश" एक नवीन मराठी चित्रपट

             मराठीत हल्ली उत्तम कथानक असलेले चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. त्या रांगेत अजून एक चित्रपट उभा राहतोय तो म्हणजे "हुंटाश"...चित्रपटाचं नाव हटके असलेल्या ह्या चित्रपटाचं कथानक देखील इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे. अजून एक विशेष बाब म्हणजे चित्रपटातील स्टार कास्ट देखील खूप तगडी आहे. किशोर नांदलस्कर,विजय चव्हाण,अरुण नलावडे,उषा नाडकर्णी,संजिवनी जाधव,निला गोखले,अंकुश ठाकूर,प्रियांका पुलेकर हे कलाकार "हुंटाश" या चित्रपटात झळकणार आहेत.


            नक्षत्र मुव्हीज प्रस्तुत अच्युत नावलेकर आणि अपर्णा प्रमोद निर्मित अंकुश ठाकूर लिखित आणि दिग्दर्शित "हुंटाश" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या अजून बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत.



majja.ooo : Ankita Lokhanade.

Thursday 6 April 2017

पियुष प्रथमच साकारणार खलनायकाची भूमिका..........

                  ती देते तो देतो सगळे देतात.... " शिव्या"... अगदी वेगळं कथानक आणि एका वेगळ्याच धाटणीवर आधारित असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संस्कृती आणि भूषण यांना आपण एकत्र काम करताना पहिलेच आहे. परंतु ह्या चित्रपटात प्रथमच पियुष रानडे हा खलनायकाची भूमिका साकारणार आहे. आपण पियुष ला अनेक भूमिकांमध्ये पहिले आहे परंतु खलनायक म्हणून हि त्याची पहिलीच वेळ आहे. झी मराठी वरील लज्जा या मालिकेने तो महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. त्यानंतर झी मराठीवरील अस्मिता या गाजलेल्या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.


                  तो पहिल्यांदाच आपल्याला खलनायकाच्या भूमिकेत पाहायला भेटणार आहे. त्याची हि भूमिका प्रेक्षकांना किती आवडते हे शिव्या हा चित्रपट बघूनच कळेल. हा चित्रपट नक्कीच आपल्याला एक वेगळा अनुभव देऊन जाईल हे नक्की. मग पाहायला विसरू नका २१ एप्रिल रोजी शिव्या चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.







majja.ooo : Ankita Lokhande.

Wednesday 5 April 2017

जय मल्हार मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप...

             "येळकोट येळकोट जय मल्हार" हा आवाज २ वर्षे झाले दर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता महाराष्ट्राच्या घराघरांतून ऐकू येतो. महाराष्ट्राच्या या कुलदैवताबद्दल बरीच माहिती ह्या मालिकेने प्रेक्षकांना मिळवून दिली. झी मराठीवरील हि मालिका खूप गाजली. हि मालिका १८ मे २०१४ ला सुरु झाली आणि ह्या मालिकेने बघता बघता ९०० एपिसोड पूर्ण केले. ह्या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकांना खर आणि जवळच वाटू लागलं. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी म्हणजे हि मालिका लवकरच संपुष्टात येत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हि मालिका बंद करण्याचा निर्णय ह्या मालिकेने घेतला आहे.


                    दिग्दर्शक महेश कोठारे देवदत्त नागे,सुरभी हांडे,इशा केसकर हि आणि अशी ह्या मालिकेतील निगडित बरीच मंडळी प्रेक्षकांच्या नंतरही लक्षात राहतील. ह्या मालिकेचं शेवटचं शूटिंग १५ एप्रिल ला होणार आहे. तोपर्यंत हि मालिका एन्जॉय करा आणि बघत राहा सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता जय मल्हार फक्त झी मराठीवर.





majja.ooo : Ankita Lokhande. 

Monday 3 April 2017

‘शिव्या’ चित्रपटाचं म्युझिक लाँच!

                   'ती देते, तो देतो, ते देतात, सगळेच देतात शिव्या" शिव्या तुम्ही देता का.. ?  हटके नाव हटके कथानक आणि असे बरेच हटके प्रयोग घेऊन दिग्दर्शक साकार राऊत २१ एप्रिल रोजी शिव्या चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं म्युझिक लाँच करण्यात आलं. चित्रपटाची स्टार कास्ट या कार्यक्रमाला हजर होती.

          निलेश लोटणकर यांनी ह्या चित्रपटाचं टायटल साँग लिहिले आहे आणि श्रीरंग उर्हेकर यांनी ते संगीत बद्ध केले असून गायक अनिरुद्ध जोशी ने हे गाणं गायलं आहे. चित्रपटात एकूण २ गाणी आहेत. संस्कृती बालगुडे आणि भूषण प्रधान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच पियुष रानडे देखील या चित्रपटात झळकणार आहेत यासोबतच विद्याधर जोशी, उदय सबनीस, शुभांगी लाटकर हे कलाकार देखील झळकणार आहे.
                 हा चित्रपट नक्कीच आपल्याला एक वेगळा अनुभव देऊन जाईल हे नक्की. मग पाहायला विसरू नका २१ एप्रिल रोजी शिव्या चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.
म्युझिक लाँच ची काही छायाचित्रे : 














majja.ooo : Ankita Lokhande.