Thursday 30 March 2017

'धोंडी'....लवकरचं येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

                     मराठीत कथानक हा खूप मोठा घटक बनला आहे. असाच एक वेगळ्या धाटणीचा आणि हळव्या विषयावर आधारित धोंडी हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी ह्या विषयावर चित्रपट तसे अनेक आलेत परंतु धोंडी हा त्या सर्वांपेक्षा वेगळ्या रांगेत उभा राहतो.महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या प्रत्येक शेतकर्याच्या मुलांना काय वाटते हे दर्शवणारा चित्रपट म्हणजे "धोंडी"...एक खूप सुंदर आणि मनाला हेलावून जाणारा असा संदेश ह्या चित्रपटातून प्रेक्षकांना दिग्दर्शक मोनिश पवार देणार आहेत.

                    ह्या चित्रपटाची अजून एक खास गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाची स्टारकास्ट. अभिनेते सयाजी शिंदे अभिनेत्री पूजा पवार आणि बालकलाकार तसेच नॅशनल अवॉर्ड विनर विवेक चाबुकस्वार देखील ह्या चित्रपटात झळकणार आहे. सयाजी शिंदे ह्यांना आपण नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत बघत आलो आहोत धोंडी मध्ये देखील ते प्रथमच शेकऱ्याची भूमिका साकारणार आहेत. तसेच अभिनेत्री पूजा पवार देखील खूप वर्षांनी चित्रपटात पुन्हा एकदा पदार्पण करणार आहेत. आता सयाजी शिंदे आणि पूजा पवार हि जोडी त्यांच्या अभिनयाने धोंडी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील यात काहीच शंका नाही.
                  शेतकऱ्यांच्या लहान मुलांची असणारी मानसिकता आणि त्या मानसिकते भोवती फिरणारे कथानक बघायला तुम्हाला नक्की आवडेल. कोणीही गॉडफादर नसताना इतक्या भावनिक विषयावर उत्कृष्ट चित्रपट बनवण्याचे काम दिग्दर्शक मोनिश पवार यांनी केले आहे .सॉईल इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट निर्मित आणि सॉइल गृप ऑफ कंपनीज प्रस्तुत "धोंडी "या चित्रपटाचे निर्माते शिवाजी जाधव,भानुदास पवार,शैलेंद्र सुपेकर असून मोनीश पवार हे दिग्दर्शक आहेत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या  भेटीला येणार आहे.
शूटिंग दरम्यानची काही छायाचित्रे: 










majja.ooo : Ankita Lokhande.

Tuesday 28 March 2017

विक्रम गोखलेवर आधारित माहितीपट लवकरच....

                    अभ्यासू, चोखंदळ आणि शिस्तीचा कलावंत असे विविध कंगोरे असणाऱ्या दिग्गजांच्या यादीत विक्रम गोखले याचे नाव मानाने घेतले जाते. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटातून सहजगत्या रसिकांच्या मनाचा वेध घेण्यास यशस्वी ठरलेल्या या कसबी कलाकाराची अभिनय कारकीर्द प्रदिर्घ आहे. 
विक्रम गोखले यांच्या घराण्यातच कलावंतशाही मुरलेली दिसून येते. त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या महिला बालकलाकार तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी  आणि चित्रपटातील नावाजलेले अभिनेते होते. अशाप्रकारे अभिनयाची गेली १०० वर्षे जुनी परंपरा असणा-या 'गोखले' कुटुंबियाचे विक्रम गोखले एक महत्वाचे शिलेदार आहेत! मात्र, घराणेशाहीच्या जोरावर अभिनयक्षेत्रात दमदार पाऊल टाकण्याचा मार्ग त्यांनी कधीच स्वीकारला नाही, त्यापेक्षा स्वकर्तुत्वाची कास धरत आणि अभिनयाचे सूक्ष्म कंगोरे आत्मसात करत आपला वेगळा ठसा उमटवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तीन भाषेमध्ये काम करत विक्रम गोखले यांनी आपल्यातील कलावंताला अधिक प्रगल्भ केले. 


अभिनय क्षेत्राची तब्बल ५० वर्ष अविरत सेवा करताच त्यांनी दुसरीकडे सामाजिक बांधिलकीचा वसा देखील जपला. अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी वडील चंद्रकात गोखले यांसोबत गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करीत आहे. अशा या मातब्बर नटश्रेष्टाच्या कारकीर्दीचा आढावा लवकरच माहितीपटातून घेतला जाणार आहे. थीम्स अनलिमिटेड आणि इंडियन फिल्म स्टुडियोच्या बेनरखाली ह्या माहितीपटाचे चित्रीकरण होत असून, योगेश सोमण, आशिष वाघ आणि उत्पल आचार्य या तीन निर्मात्यांची फक्कड तिकडी याला लाभली आहे, तसेच या माहितीपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन विवेक वाघ करीत आहेत. 

शेखर ढवळीकर लिखित या माहितीपटातून विक्रम गोखले यांच्या अभिनयाची प्रदीर्घ कारकीर्द रसिकांसमोर सादर केली जाणार आहे, या माहितीपटाबरोबरच विक्रम गोखले यांच्या आयुष्यातील महत्वाच्या लोकांकडून त्यांचा जीवनप्रवास देखील कथित केला जाईल, शिवाय, खुद्द विक्रम गोखले देखील आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करताना दिसतील. अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले या विक्रमी कलावंताचा हा माहितीपट लवकरच प्रदर्शित होत आहे.




Monday 27 March 2017

विविध प्रयोगांनी नटलेलं एक धम्माल विनोदी नाटक

                  मराठी रंगभूमीकडे सध्या प्रेक्षकवर्ग बऱ्याच प्रमाणात रस घेत आहेत असं बोलायला काहीच हरकत नाही. मराठी रंगभूमी हि नेहमी प्रमाणे वेगळे वेगळे विषय प्रेक्षकांसमोर मांडत आली आहे. असच एक वेगळ्या धाटणीचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे नाटकाचे नाव आहे ' तुमचं आमचं सेम नसतं '... खूप वेगळा विषय आणि एक निराळा पण पटणारा असा विचार या नाटकातून आपल्याला अनुभवायला मिळतो. प्रेम म्हणजे प्रेम असत.. पण तुमचं आमचं कधीच सेम नसतं अश्याच काही कथानकावर आधारित हे नाटक आहे. नाटक म्हंटल कि प्रेक्षकांना लागतो तो ओळखीचा चेहरा परंतु दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी नवीन चेहऱ्यांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे.

                    ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांनी रंगभूमीवरील अनेक नाटक गाजवली आता त्यांचा सुपुत्र वरद चव्हाण देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन स्वतःच नाव या चित्रपटसृष्टीत निर्माण करत आहे. वरद व्यतिरिक्त या नाटकात अनेक नवीन चेहरे आपल्याला  पाहायला भेटतात. उत्तम अभिनय आणि भूमिकेची जाण योग्य पद्धतीने हाताळून हे सर्व रंगभूमीवर काम करताना दिसतात. सिद्धार्थ पगारे,आदित्य भालेराव,गौरी जोगळेकर,कविता मगरे,अभिजित दुलगज आणि नितीन कुर्लेकर हे नवीन कलाकार आपल्याला ह्या नाटकात बघायला भेटतात.

              अजून एक विशेष म्हणजे ह्या नाटकात तीन उत्कृष्ट अशी गाणी देखील पाहायला मिळतात. ह्या सुंदर गाण्यांना संगीत बद्ध केले आहे तृप्ती चव्हाण यांनी. साईराम अय्यर,तृप्ती चव्हाण आणि करण यांच्या आवाजाने ह्या गाण्याची शोभा अजून वाढवली आहे. ह्या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केले आहे.यश क्रिएशन आणि परीस प्रोडक्शन प्रस्तुत आणि के.प्रतिमा व सौ.अर्चना निलेश चव्हाण निर्मित विविधतेने नटलेल्या ह्या नाटकाचा पुढील प्रयोग मंगळवार ४ एप्रिल दुपारी ४;३० वाजता सावित्रीबाई फुले,डोंबिवली  येथे असणार आहे. एका वेगळ्या नाटकाचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ह्या नाटकाचा प्रयोग चुकवू नका.







majja.ooo : Ankita Lokhande.

अजय देवगण आणि नाना पाटेकर करणार एका नवीन मराठी चित्रपटाची निर्मिती...

           हिंदी कलाकारांची ओढ हि दिवसेंदिवस मराठी चित्रपटसृष्टीकडे वळताना दिसतेय. यात अजून एक अभिनेत्याची भर पडलीये  अजय देवगण याची. हिंदी अभिनेता अजय देवगण याने यापूर्वीही विटीदांडू या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता पुन्हा तो एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे समजते. अजय देवगण  सोबत मराठमोळे नाना पाटेकर हे सुद्धा चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. निर्मिती सोबतच नाना पाटेकर एका विशेष भूमिकेतही दिसणार आहेत. चित्रपटाचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे.


         परंतु हा एक थरारपट आहे असे समजून येते. नाना पाटेकर बऱ्याच दिवसांनी एका थरार असणाऱ्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजय देवगण,नाना पाटेकर आणि अभिनव शुक्ला हे तिघे ह्या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. नाना पाटेकर आणि अजय देवगण यांच्या चाहत्यांसाठी हि नक्कीच एक मेजवानी ठरणार आहे.






majja.ooo : Ankita Lokhnade.

अभिनेते अरुण नलावडे सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा...

         नाटक,मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केवळ अभिनयापुरते सीमित न राहता दिग्दर्शनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. "ताटवा" या आगामी  चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  ते ह्या चित्रपटात शिल्पकारांची एक वेगळी भूमिका साकारताना दिसतील. त्यामुळे दिग्दर्शक आणि अभिनेता अश्या दुहेरी भूमिकांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाची कथा समाजातील विषमतेवर भाष्य करीत,पाथरवट समाजातील होतकरू मुलीचा जीवनप्रवास रेखाटणारी आहे. संजय शेजवळ व गौरी कोंगे हि नवीन जोडी आपल्याला ह्या चित्रपटात झळकणार आहे. डॉ. शरयू पाझारे निर्मित "ताटवा" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे



majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday 25 March 2017

"सुरक्षित अंतर ठेवा "...एक नवीन नाटक लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला..

 मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा झेंडा रोवणारे चतुरस्त अभिनेते म्हणजेच पुष्कर श्रोत्री. मराठी रंगभूमीवर त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका हि आजही नाट्यरसिकांच्या लक्षात राहते. चित्रपट असो किव्हा नाटक त्यांची देहबोली आणि भाषाशैली यामुळे त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली.

 आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवीन नाटक ते रंगभूमीवर घेऊन येत आहेत. "सुरक्षित अंतर ठेवा " हे ह्या नाटकाचं नाव आहे.. नाटकाचं नाव बघता काहीतरी गंमतीशीर आणि मज्जेदार कथानक आपल्याला बघायला मिळणार हे नक्की."लग्न करणार असाल तर जरूर बघा ..लग्न करणार नसाल तर बघू सुद्धा नका...!!!
आणि..लग्न झालेच असेल तुमचं ..तर मग..तर मग ..काही इलाज नाही ..बघावंच लागेल...!!!" अश्या वेगळ्या धाटणीचं नाटक लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. ह्या नाटका विषयीच्या अजून बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत. अष्टविनायक निर्मित "सुरक्षित अंतर ठेवा" ह्या साठी पुष्कर श्रोत्री याना खूप शुभेच्छा.

लिंक : https://www.youtube.com/watch?v=CE7Ah7Mkcws



majja.ooo : Ankita Lokhande.

Friday 24 March 2017

"६ गुण"..१४ एप्रिल ला प्रेक्षकांच्या भेटीला....

               मराठीमध्ये काही अश्या मोजक्याच जोड्या आहेत ज्या प्रेक्षकांना बघायला पुन्हा आवडतील. त्यापैकी एक जोडी म्हणजे किल्ला फेम अमृता सुभाष आणि अर्चित देवधर. ह्या ऑनस्क्रीन माय लेकाच्या जोडीने किल्ला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. आता पुन्हा ते आपल्याला ६ गुण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच सुनील बर्वे हे देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ह्या चित्रपटाचे पोस्टर हे प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

            पोस्टर बघता हा चित्रपट लहानमुलांच्या शिक्षणावर बेतलेला असू शकतो असे वाटते. १४ एप्रिल २०१७ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच फेस्टिवल मध्ये पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या ६ गुण या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण गावडे यांनी केलं असून निर्माते उज्वला गावडे आणि सह-निर्माते अशोक कोटियन आणि शैला राव आहेत. किल्ला प्रमाणेच हा चित्रपटही यशाची उंची गाठेल हे नक्कीच.. ६ गुण च्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.


majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday 23 March 2017

विसरभोळा भरत येणार नकटीला बघायला...

         नकटीच्या लग्नाला यायचं हं... हि मालिका सध्या झी मराठीवर जोरदार सुरु आहे. दरवेळेस नवीन कलाकार नुपूरचा जोडीदार व्हायला येतात. आता ह्यावेळेस हजेरी लावली आहे ती कोल्हापूरच्या भरत जाधव यांनी.'मला लक्षात सगळं राहतं पण आठवत काहीच नाही'अशा स्वभावाचा मुलगा नकटीला पसंत पडेल का हे बघायला तुम्हालाही मज्जा येईल.


आता दामोदर निवासात येऊन विसरभोळा भरत नकटीचा जोडीदार होईल का..?  यासाठी पाहायला विसरू नका दर बुध-शनि रात्री १० वाजता नकटीच्या लग्नाला यायचं हं फक्त झी मराठीवर.



majja.ooo : Ankita Lokhande.

Tuesday 21 March 2017

संतोष कोल्हे घेऊन येत आहेत एक नवीन ट्रॅव्हल शो..

            नक्की हा वायरस आहे तरी काय हा प्रश्न सगळ्यांनाच बऱ्याच दिवसांपासून पडलाय..मुंबईभर पसरलेल्या ह्या वायरस चा नक्की हेतू तरी काय आहे..? ह्याच उत्तर आता आम्हाला सापडलंय. हा मास्क घातलेला माणूस नक्की आहे तरी कोण..? नुकताच एक व्हिडिओ वायरस मराठी ह्या अकॉउंट वरून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  आणि प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे भटकंती आणि झुंज मराठमोळी नंतर दिग्दर्शन संतोष कोल्हे घेऊन येत आहेत एक हटके मजेशीर " ट्रॅव्हल शो "... मास्क घातलेला त्यांचा चेहरा हा व्हिडीओ द्वारे उघडकीस आलाय. आणि वायरस मराठी हे दुसरं तिसरं काही नसून त्यांच्या युट्युब चॅनल चे नाव आहे.

"Awesome Twosome..unmapped पायवाटा " हा नवीन ट्रॅव्हल शो आणि Shock कथा हि Fiction सिरीज गुढीपाडव्याच्या निम्मिताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या ट्रॅव्हल शो मध्ये अभिनेत्री गौरी नलावडे आणि नृत्यांगना रिचा अग्निहोत्री देखील झळकणार आहे.


          रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून काही काळ मनोरंजन देण्याच्या हेतून दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी हि कल्पना काढली आहे. सोबत youtube link देत आहोत... प्लिज like करा, शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे subscribe करा... काहीतरी वेगळं आणि मज्जेदार अनुभवायचं असेल तर हे चॅनल subscribe करायला विसरू नका.

https://www.youtube.com/channel/UCoD1Uv6OP_uYqS1IReOH17Q



majja.ooo : Ankita Lokhande.

Monday 20 March 2017

झी चित्र गौरव पुरस्कार २०१७...

झी चित्र गौरव पुरस्कार २०१७ मधील काही छायाचित्रे आणि विजेत्यांची यादी :


सर्वोत्कृष्ट वेशभूषा - सचिन लोवळेकर (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा - विद्याधर भट्टे (एक अलबेला)
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन -   वासू पाटील (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन -  राहूल - संजीव – “ओ काका” (वाय झेड)
उत्कृष्ट संकलन - मोहित टाकळकर (कासव)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण -  संजय मेमाणे (हाफ तिकीट), धनंजय कुलकर्णी (कासव)
सर्वोत्कृष्ट ध्वनिरेखाटन- अनमोल भावे (उबुंटू)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत-अजय-अतुल (सैराट)
सर्वोत्कृष्ट गीतकार -समीर सामंत – “माणसाने माणसाशी” (उबुंटू)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका-श्रेया घोषाल – “आताच बया का बावरलं” (सैराट)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक-अजय गोगावले – “याड लागलं” (सैराट)
सर्वोत्कृष्ट संगीत-अजय-अतुल (सैराट)

सर्वोत्कृष्ट कथा-   राजन खान (हलाल)
सर्वोत्कृष्ट पटकथा- गिरीश जोशी  (टेक केअर गुडनाइट)
सर्वोत्कृष्ट संवाद - सुमित्रा भावे (कासव)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- प्रियांका बोस कामत (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - प्रियदर्शन जाधव (हलाल)
गार्नियर नॅचरल प्रस्तुत मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर –  रिंकू राजगुरु  (सैराट)
इम्पेरिअल ब्लु पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट पदार्पण- आकाश ठोसर (सैराट)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- शुभम मोरे, विनायक पोतदार (हाफ तिकीट)
विशेष लक्षवेधी चित्रपट (ज्युरी अवॉर्ड)-  नदी वाहते

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- इरावती हर्षे (कासव)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- गिरीश कुलकर्णी (जाऊंद्याना बाळासाहेब)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- नागराज मंजुळे (सैराट)
सर्वोत्कृष्ट चित्रपट- सैराट - झी स्टुडिओज्












majja.ooo : Ankita Lokhande.

चव्हाण पुन्हा रंगभूमीवर.....

               चार दशकाहून अधिककाळ विविध रंगभूमिका करून रसिकांना खदखदून हसायला लावणारा एक चतुरस्त नट म्हणजेच विजय चव्हाण. त्यांनी रंगभूमीवर अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिका करताना त्या भूमिकेला योग्य न्याय कसा मिळेल याचाही पुरेपूर विचार केला. रंगभूमीवरील त्यांची प्रत्येक भूमिका खूप गाजली. त्यांनी रंगभूमीवर सादर केलेली मोरूची मावशी,टूर टूर,श्रीमंत दामोदर पंत हि नाटक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
               कामाला प्रथम प्राधान्य देणाऱ्या विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण याने "तुमचं आमचं सेम नसतं" या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. आपल्या वडिलांच्या नावाचा फायदा न घेता वरद ने अजूनही चांद रात आहे,मंगळसूत्र यांसारख्या मालिका आणि ऑन ड्युटी २४ तास,खो-खो,धनगरवाडा,वात्सल्य यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता नुकतंच १०० डेज हि मालिका त्याने केली. तसेच वरद आता माणूस एक माती या चित्रपटात देखील पाहायला मिळणार आहे
.

                 नितीन कांबळे दिग्दर्शित तुमचं आमचं सेम नसतं हे धम्माल विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला. या नाटकाचा पुढील प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. २१ मार्चला रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन ,ठाणे येथे हा प्रयोग पार पडणार आहे. जर चव्हाण पुन्हा रंगभूमीवर तुम्हाला अनुभवायचे असतील तर हे नाटक पाहायला विसरू नका. वरद सोबत या नाटकात सिद्धार्थ पगारे,आदित्य भालेराव,गौरी जोगळेकर,कविता मगरे,नितीन कुर्लेकर,आणि अभिजित दुलगज हे नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. कलावंताचा दमदार अभिनय आणि योग्यवेळी होणारी विनोद निर्मिती हे सर्व आपल्याला ह्या नाटकात अनुभवायला मिळतं. ह्या नाटकाचा प्रयोग म्हणजे नाट्यरसिकांसाठी एक मेजवानी असेल असे बोलायला काही हरकत नाही.
              वरद चव्हाण आणि ह्या नाटकाच्या संपूर्ण टीम ला majja.ooo तर्फे खूप शुभेच्छा....


वरद चव्हाण आणि विजय चव्हाण यांची काही छायाचित्रे:







majja.ooo : Ankita Lokhande.

रिचा अग्निहोत्रीही विचारतेय नक्की हा 'वायरस' आहे तरी काय...?

          हल्ली सगळे कलाकार सोशल मीडियावरून लाईव्ह जातात आणि आपल्या चाहत्यांशी मनमुराद गप्पा मारतात.आपल्या दिवसभराच्या दगदगीतून काही तास ते आपल्या चाहत्यांना देत असतात. आपल्या आवडत्या कलाकाराच्या तोंडून आपलं नाव येणं हि खरंच एखाद्या चाहत्यांसाठी मोठी गोष्ट आहे. नृत्यांगना रिचा अग्निहोत्री हि शनिवारी ९;३० वाजता तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून लाईव्ह गेली आणि आपल्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. आणि तिने तिच्या चाहत्यांना विचारलं कि मी खूप थकली आहे, मला कुठेतरी बाहेर जायचं आहे, तुम्ही मला काही जागा सांगू शकता का..?  ह्या गप्पा रंगत असतानाच वायरस मराठी ह्या अकाउंट वरून " रिचा आम्ही तुझ्यासाठी काहीतरी Awesome घेऊन येतोय " असा मॅसेज करण्यात आला.


 हा वायरस नक्की आहे कोणाचा आणि रिचा साठी नक्की काय स्पेशल असणार आहे ह्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. वायरस म्हंटल कि मन थोडं अस्वस्थ होतं परंतु रिचा साठी Awesome असं काय असणार आहे ह्याची उत्सुकता तुमच्यासारखीच आम्हांलाही आहे.





majja.ooo : Ankita Lokhande.

Sunday 19 March 2017

आठवणींच्या मुरांब्याची गोडी वाढवणारे ‘मुरांबा’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित’

       उन्हाळा सुरु झाला की वेध लागतात ते करवंद, चिंचा या रानमेव्याचे, पापडाच्या लाट्या आईची नजर चुकवून खाण्याचे, लोणच्यासाठी चिरून ठेवलेल्या कैऱ्यांचे आणि आजीने घातलेल्या मुरांब्याचे! हा आठवणींचा मुरांबा आठवण्याचे कारण म्हणजे नुकतेच प्रदर्शित झालेले ‘दशमी स्टुडीओज्’, ‘ह्यूज प्रोडक्शन’ आणि ‘प्रतिसाद प्रोडक्शन’ प्रस्तुत ‘मुरांबा’ या चित्रपटाचे पोस्टर!


     ‘वरूण नार्वेकर’ लिखित आणि दिग्दर्शित असणाऱ्या ‘मुरांबा’ या चित्रपटाचे  पोस्टर बघताच क्षणी, हातात ‘बिअर’, क्षितिजाकडे लागलेली नजर आणि  आजूबाजूच्या जगाची अजिबात जाणीव नसणारे, आठवणींमध्ये हरवून गेलेले ‘तो’ आणि ‘ती’ आठवतात. आणि साहजिकच आपल्याही डोळ्यासमोर आपापल्या आयुष्यातील ‘ती’च्या  किंवा ‘त्या’च्या आठवणी तरळतात.
     सिनेमाच्या नावावरून आणि पोस्टरवरून आठवणींचा पट उलगडणारी तरल  कथा या चित्रपटाद्वारे मांडली जाणार आहे याचा अंदाज येऊन चित्रपटाविषयी उत्सुकता वाढत आहे. 






majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday 18 March 2017

मधुराचा आवाज गुंजणार हॉलिवूड चित्रपटात...

         आपल्या चाहत्यांसाठी हि दिग्गज कलाकार मंडळी नेहमीच काहीतरी नवीन करत असतात. कधी चित्रपट कधी वेगळ्या प्रकारची गाणी गातात तर कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आव्हानात्मक भूमिका करतात. मग ते चित्रपटसृष्टीतील कोणत्याही क्षेत्रात असो. आणि महत्वाची बाब म्हणजे बॉलीवूड नाहीतर हॉलिवूडमध्येही हे कलाकार जाऊन पोहोचले. ह्या रांगेत अजून एक नाव उभं राहतं ते म्हणजे गायिका मधुरा कुंभार हीच. मराठी मध्येतर तर तिने आपल्या आवाजाचा झेंडा रोवला परंतु आता तिचा आवाज थेट हॉलिवूडच्या चित्रपटात ऐकायला भेटणार आहे.

         ह्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'ब्युटी अँड द बिस्ट' हा हॉलिवूड चित्रपट हिंदी मध्ये डब करण्यात आला. आणि त्या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये आवाज दिला तो मधुराने. एका हॉलिवूड चित्रपटात मराठी गायिकेचा आवाज जाणं हे खरंच मराठीचित्रपटसृष्टीचे अहोभाग्य म्हणावं लागेल. इमा वॅटसन या बॉलिवूड अभिनेत्रीला मधुराने आवाज दिला. एवढंच नव्हेतर ह्यात मधुराने चक्क ५ गाणी गायली. "हा सगळं खूप मस्त अनुभव होता" असं ती म्हणते.

        सध्या बऱ्याच चित्रपटांचं तीच रेकॉर्डिंग चालू आहे आणि लवकरच ती आता झी युवा च्या सरगम या संगीत मालिकेत लवकरच मधुरा देखील झळकणार आहे. कोणीही गॉडफादर नसताना मधुराने तिच्या आवाजाचे नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. मधुराला तिच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.





majja.ooo : Ankita Lokhande.

Friday 17 March 2017

काय आहे हा वायरस... जाणून घ्या येथे

            वायरस हे नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा उभा राहतो.आपल्या मोबाईल मध्ये वायरस आला म्हणजे आपल्या पाय खालची जमीन सरकते. हा अस्वस्थ करणारा एक वायरस सध्या सगळीकडे दिसत आहे. सोशल मीडिया वर या वायरस ने थैमान मांडलं आहे. एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर दिसून येत असून त्यात एक माणूस हा वायरस पसरवत असताना दिसतोय नक्की कोण आहे हा माणूस आणि हा वायरस आहे तरी काय..? हा प्रश्न तुमच्यासारखा आम्हालाही पडलाय... सध्या हा वायरस संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे.

                                                     https://youtu.be/qyF1iHQnWIE

         वरील लिंकवर दिलेल्या माहितीनुसार येत्या २० मार्चला ह्या वायरसचा खुलासा होणार आहे. हा व्हिडीओ तुमच्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना पाठवा आणि ह्या वायरस पासून सावधान रहा. हवायरस बद्दलची आधी माहिती तुम्हाला majja.ooo या पेज वर भेटतच राहील. तोपर्यंत सावधान रहा.






majja.ooo : Ankita Lokhande.

Wednesday 15 March 2017

गुलशन देवय्या झळकणार मराठी चित्रपटात...

          मराठी चित्रपटांनी येत्या काही वर्षात कमालीची उंची गाठली आहे. तसेच हिंदी कलाकार आता मराठीकडे वळत आहेत.. अलीकडे मराठीमध्ये चांगले कथानक असलेले चित्रपट गाजत आहेत आणि ह्याचमुळे हिंदी कलाकारांचं लक्ष ही ह्या कडे वळत आहे. हंटर,रामलीला,शैतान या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना अभिनेता गुलशन देवय्या आपल्याला दिसला आहे. आता ' डाव 'या चित्रपटात आपल्याला गुलशन देवय्या एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. आणि ह्या चित्रपटासाठी तो दीड महिना मराठी शिकतोय... कथानक चांगलं असल्यामुळे मी ह्या चित्रपटात काम करायचे ठरवले असे तो सांगतो.

 कनिष्क वर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून हा चित्रपट मराठीसह हिंदी मध्येही शूट होतोय. गुलशन देवय्या ला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.



majja.ooo : Ankita Lokhande.

Tuesday 14 March 2017

पांडू अडकणार लग्न बेडीत

                   झी मराठी वरील मालिका नेहमीच आपल्या आयुष्यात मालिकांच्या रूपाने सुखाचे काही तास घेऊन येत असतात त्यातलीच एक मालिका होती ती म्हणजे रात्रीस खेळ चाले.. ह्या मालिकेच्या थरारक कथानकामुळे हि मालिका एका रात्रीत हिट झाली. ह्या मालिकेमधल्या सगळ्याच भूमिका खऱ्या वाटू लागल्या आणि त्यातलीच एक भूमिका म्हणजे पांडू ची.... ह्या वेड्या पांडू ने महाराष्ट्रभरच्या लोकांना वेड लावून सोडलं... 'इसरलंय' हा त्याचा डायलॉग प्रसिद्ध झाला त्याच्या मालवणी भाषेमुळे तो सर्वांच्या लक्षात राहिला.


                 आता हाच पांडू म्हणजेच प्रल्हाद कुडतरकर आता लग्न बेडीत अडकणार आहे. अंजली कानडे या मुलीसोबत नुकताच त्याचा साखरपुडा झाला. हे दोघे मे २०१७ ला लग्नबेडीत अडकणार असल्याची माहिती मिळते. रात्रीस खेळ चाले चे संवाद हे प्रल्हादनेचं लिहिले होते आणि आता नाकटीच्या लग्नाला यायचं हं चे संवादही तो लिहीत आहे ... आपल्या लाडक्या पांडूला म्हणजेच प्रल्हादला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा



majja.ooo : Ankita Lokhande

अमेय वाघ झळकणार एका नवीन वेबसिरीज मध्ये

              ऑल्ट बालाजी प्रोडक्शनच्या माध्यमातून एक भन्नाट वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉयगिरी असे या वेबसिरीज चे नाव आहे. आता यात असं काय खास आहे असा तुम्ही विचार करत असाल ना..? तर आनंदाची बातमी अशी कि दिल दोस्ती दुनियादारीतून घराघरात पोहोचलेला आपल्या सर्वांचा लाडका कैवल्य म्हणजेच अमेय वाघ आता आपल्याला ह्या नव्या हिंदी वेबसिरीज मध्ये दिसणार आहे.


                   मैत्री,मस्ती आणि मुला-मुलांची एकमेकांशी व्यक्त होण्याची गंमतीशीर भाषा यावर आधारीत असं या वेबसिरीजच कथानक आहे. मेन नेव्हर ग्रो अप या तत्त्वांवर दिसणारं त्यांचं मजेशीर वागणं आपल्याला पाहायला मिळणार आहे. दर प्रोजेक्ट मध्ये काहीतरी वेगळं करणं हि बालाजीची खासियत आहे. आता बालाजी  अमेय ला घेऊन काय नवीन करणार आहे ह्याची उत्सुकता सर्वाना आहे.    


majja.ooo : Ankita Lokhande.

Saturday 11 March 2017

सरस्वतीची टीम पोहोचली दुबईमध्ये

      कलर्स मराठी वाहिनीवरील सरस्वती मालिका सध्या बरीच गाजतेय. ह्या मालिकेतील सरस्वती आणि राघव म्हणजेच अस्ताद आणि तितिक्षा गेलेत थेट दुबई मध्ये. आता तिथे होणारी मज्जा मस्ती आणि असे बऱ्याच गोड क्षणांची काही छायाचित्रे







Majja.ooo: Ankita Lokhande.

'तुमचं आमचं सेम नसतं'.. एक नविन मराठी नाटक

              सध्या मराठी प्रेक्षक चित्रपटांपेक्षा नाटकांकडे जास्त अग्रेसर आहे. आणि सध्या मराठी नाटक वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करत आहेत. अश्याच हिट झालेल्या नाटकांमध्ये अजून एका नाटकाचा समावेश होणार आहे. एक नवीनकोर मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे नाटकाचं नाव आहे 'तुमचं आमचं सेम नसतं'... नाटकाचं नाव बघता तुमचं आमचं काय सेम नसेल हा प्रश्न मात्र नाटक बघूनच सुटेल..परंतु प्रेमावर आधारित नाटक असल्यामुळे यात काय ट्विस्ट अँड टर्न्स येतील आणि हि कथा कशी फुलत जाईल हे जाऊन घ्यायचं असेल तर या नाटकाला जरूर जा..

            यश क्रिएशन्स आणि परीस एंटरटेन्मेंट यांच्या बँनर अंतर्गत अर्चना निलेश चव्हाण आणि के.प्रतिमा निर्मित 'तुमचं आमचं सेम नसतं' या नाटकाचे दिग्दर्शन,लेखन हे नितिन कांबळे यांनी केलं असून नाटकाचं संगीत तृप्ती चव्हाण यांनी केलं आहे.आणि नैपथ्याची धुरा हरेश अय्यर यांनी सांभाळली आहे. नाटकाच्या बऱ्याच अजून गोष्टी गुलदस्त्यात आहेत. 'तुमचं आमचं सेम नसतं' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १५ मार्च, २०१७ सायंकाळी : ४:३० वाजता विष्णुदास भावे, वाशी येथे होणार आहे. एक वेगळ्या नाटकाचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की या नाटकाचा अनुभव घ्या.




majja.ooo : Ankita Lokhande.

Thursday 9 March 2017

प्रतिभावंत कलाकार.. मकरंद अनासपुरे

                 देहबोली,भाषाशैली आणि त्यांच्या विनोदी संवादांनी मराठी चित्रपटसृष्टीवर मराठीचा ठसा उमटविणारे चतुरस्त कलाकार म्हणजेच मकरंद अनासपुरे. सुपरस्टार मकरंद अनासपुरे यांचा जन्म औरंगाबाद येथे २२ जुलै १९७३ रोजी झाला अभ्यासात हुशार असलेल्या मकरंद अनासपुरे यांनी पहिल्यांदा नाटकात काम केलं ते चौथी मध्ये असताना,त्यावेळेस पारितोषिक मिळालं एक पेन्सिल आणि खोडरबर आणि ह्या मिळालेल्या पारितोषिकाने त्यांचं नातं अभिनयही कायमचं जोडलं.. लहानपणापासून त्यांना डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती परंतु काही कारणांमुळे प्रवेश मिळाला नाही मग त्यांनी BSC करायचे ठरवले. बालपणी नाना पाटेकरांच्या अंकुश हा सिनेमा त्यांनी २६ वेळा पहिला आणि नानांच्या अभिनयाची छाप यांच्यावर एवढी पडली कि त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवायचे निश्चित केले. यासाठी ते बीड मधून औरंगाबाद मध्ये आले . 
                  अभ्यासासोबतच एकांकिका मध्ये काम करणं हि सुरु होतं.. त्यांनी तेव्हा अनेक पारितोषिक हि मिळवली. त्या दिवसात त्यांची मैत्री जडली ती अभिनेता मंगेश देसाई यांच्याशी. आणि ह्याच मित्राच्या हट्टापायी त्यांनी कलादर्पण ह्या स्पर्धेत भाग घेऊन अनेक फेऱ्यांमध्ये विजेतेपद मिळवले आणि अंतिंफेरीसाठी समूहासह मुंबईमध्ये आले. ह्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे होते नाना पाटेकर.. त्यांना मकरंद अनासपुरे ह्यांचा अभिनय इतका आवडला कि त्यांनी ''तू मुंबईला नक्की ये मी तुला मदत करेन''ह्या वाक्यात त्यांचं कौतुक केलं. आणि कलादर्पण ह्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं प्रथम पारितोषक देखील मकरंद अनासपुरे याना भेटलं. नंतर त्यांनी नाट्यशात्र विभागातून पदवी संपादन केली. हे सगळं सुरु असताना चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवण्यासाठी एकांकिकेचे दिग्दर्शनहि केले. यासाठी त्यांची फार धडपड करण्याची तयारी होती. 

                 सुरुवातीला मिळतील त्या भूमिका साकारणाऱ्या मकरंद अनासपुरे यांनी मुंबई गाठली. जवळपास ५०० हुन अधिक पथनाट्य करत असताना गावागावांमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्याकडून पथनाट्यासाठी लागणारे सांगितल्या गोळा करत त्यांची भाषा देखील हेरली. तिथलं वैविध्य जाणलं आणि नेमकं तेच प्रेक्षकांना आवडलं. मुंबईत ५०० रुपये घेऊन आलेल्या मकरंद अनासपुरे यांच्याकडे राहण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे त्यांनी सुवातीचा काळ आमदार निवासात राहून काढला. तब्बल ४ महिन्यांनी त्यांना त्यांचं पाहिलं नाटक भेटलं आणि हि संधी मिळाली ती केदार शिंदे यांच्यामुळे ''झालं एकदाचं'' या नाटकात त्यांची ७ मिनिटांची भूमिका होती आणि त्याचीच पत्रकारांनी दखल घेतली आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं हि खूप कौतुक केलं. वामन केंद्रे आणि चेतन दातार यांच्या साहाय्याने कित्येक वेळा फुकट नाटक बघून दिवस काढले. छोट्या मोठ्या मालिकांमधून ते वेगवेगळ्या भूमिका साकारत होते,''सुनं सुनं आभाळ'' हि त्यांची दूरदर्शन वरील मालिका प्रचंड गाजली त्यात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. एकीकडे स्वतःचा स्ट्रगल सुरु असताना नाना पाटेकरांनी मकरंद अनासपुरे यांना फार मदत केली. ''यशवंत''या सिनेमासाठी अभिनेता म्हणूनच नव्हे तर सहाय्यक अभिनेत्याची भूमिका त्यांच्या खांद्यावर सोपवली. याव्यतिरिक्त वजुद,जय सूर्य,यांसारख्या चित्रपटांसाठी मकरंद अनासपुरे यांचं नाव सुचवलं. टीव्ही मध्ये बेधुंद मनाच्या लहरी हि मालिका जितकी गाजली त्याचप्रमाणे नाट्यसृष्टीमध्ये टूर-टूर,जाऊ बाई जोरात,टिकलं ते पोलिटिकल या नाटकांमुळे प्रस्थापित अभिनेता म्हणून नावारूपाला आले. एका प्रयोगा दरम्यान त्यांची भेट झाली शिल्पा ह्या मुलीशी ह्याच मुलीसोबत पुढे त्यांनी विवाहसुद्धा केला. या जोडप्याला एक मुलगी सुद्धा आहे पण हिरो होणं अजून देखील बाकी होतं. हिंदी मध्ये वास्तव,प्राण जाये पर शान ना जाये हे सिनेमे त्यांनी केले. मराठी मधला सरकारनामा हा त्यांच्या पहिला चित्रपट,आणि त्यामधील त्यांच्या भूमिकेची सर्वानीच दखल घेतली मग त्यांनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या सुपरस्टारचे कायद्याचे बोला, सातच्या आत घरात ते चित्रपट प्रचंड गाजले आणि मकरंद अनासपुरे ह्यांची मागणी वाढू लागली. त्यांच्या देहबोली मुळे ग्रामीण भागातील त्यांचे बरेच चाहते वाढले आणि त्यांनी तसेच ढीगभर सिनेमे केले. गाढवाचं लग्न,जाऊ तिथे खाऊ,नाना मामा, सडे माडे ३,दे धक्का,मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटातील त्यांची रायबा ची भूमिका खूपच वेगळी होती. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा,निशाणी दावा अंगठा,सुम्बरान,खुर्ची सम्राट ह्यांसारख्या चित्रपट देऊन ते विनोद रसिकांना निखळ हसवत होते. तसेच लोकप्रियता त्यांनी एकाहून एक चित्रपट देऊन मिळवली. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं डॅम्बीस या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आणि गोष्ट छोटी डोंगराएवढी आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटासाठी ते सहनिर्माते म्हणून कार्यरत होते. 
                हजरजबाबीपणा आणि अभिनयाची उत्तम जाण असलेल्या मकरंद अनासपुरे यांनी सामाजिक भान जपत नाना पाटेकरांसोबत नाम फाउंडेशन ची स्थापना केली. महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊ केली. आणि खऱ्या अर्थाने ते शेतकऱ्यांच्या नजरेत नायक झाले. त्यांचं व्यक्तिमत्व जितकं साधं तितकं बोलकं हि आहे त्यांच्या भाषाशैलीच्या अंदाजाने त्यांनी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करून महाराष्ट्र प्रचंड हसवलं. त्यांच्या ह्या कारकिर्दीला majja.ooo तर्फे खूप शुभेच्छा. 







majja.ooo : Ankita Lokhande.